बेळगाव लाईव्ह :मुसळधार पावसामुळे अंगावर घराची भिंत कोसळून एका तीन वर्षाच्या बालीकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी महालिंगेश्वर कॉलनी, गोकाक येथे घडली.
मयत दुर्दैवी बालिकेचे नांव कीर्ती नागेश पुजारी (वय 3 वर्षे) असे असून भींत कोसळण्याच्या दुर्घटनेत 4 वर्षाची अन्य एक मुलगी जखमी झाली आहे.


भिंतीलगत झोपली असल्यामुळे दुर्घटनेत कीर्ती जागीच गतप्राण झाली. यावेळी तिचे आई-वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. मोठ्याने आवाज होऊन भिंत कोसळताच घरच्यांनी धाव घेऊन दोन्ही जखमी मुलींना मातीच्या ढिगार्यातून बाहेर काढले आणि तातडीने स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
मात्र दरम्यान कीर्तीचा गुदमरून व वर्मी दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाला होता. जखमी झालेल्या दुसऱ्या मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. गोकाक शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.





