बेळगाव शहरात आढळून आला कोरोना रुग्ण -आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

0
4
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सिंगापूर येथे कोरोना संसर्ग सुरू झाल्याची माहिती उपलब्ध झाली असताना आता गेल्या पंधरा-वीस दिवसात आपल्या राज्यातही रुग्ण आढळून येत असून आतापर्यंत राज्यात 30 ते 32 कोरोना बाधित व्यक्ती सापडल्या आहेत. बेळगाव शहरात देखील एका गर्भवती महिलेमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वर गडाडी यांनी दिली.

शहरात आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. तथापि यापूर्वी करण्यात आलेल्या लसीकरणाच्या मोहिमांमुळे लोकांमध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. मात्र तरीही लहान मुले, गर्भवती महिला, मधुमेही रुग्ण अशा प्रकारच्या रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेला एक रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्ण एक 25 वर्षीय गर्भवती महिला असून प्रथम येळ्ळूर केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारी ही महिला त्यानंतर मुख्य डॉ प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना तेथील चांचणीमध्ये तिला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

 belgaum

या पद्धतीने कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वांना माहीत असल्याप्रमाणे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत असे सांगून जिल्ह्यातील नागरिकांनी आता तशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. त्यामुळे संबंधितावर वेळीच उपचार करून त्याला बरे करता येईल असे आवाहन डाॅ. गडाडी यांनी केले.

सर्दी, ताप, खोकला वगैरे कोरोना संबंधित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या सरकारी हॉस्पिटल किंवा केएलई सारख्या खाजगी हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करून घ्यावी. या संदर्भात सरकारकडून या संदर्भात मार्गदर्शक सूची जाहीर केली जाणार असून आम्ही त्या दृष्टीने सर्व ती सज्जता केली आहे. परवा गुरुवारी मी बीम्स हॉस्पिटलला भेट दिली, त्यावेळी तेथे देखील कोरोना तपासणी वगैरे संबंधित प्रक्रियेची सिद्धता करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी तूर्तास त्या ठिकाणी 10 बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे तालुका पातळीवरील सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सिद्धता करण्यात आली आहे. एकंदर कोरोनाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ आरोग्य खात्याच्या जवळच्या डॉक्टरांना भेटून वेळेवर उपचार घेऊन सर्वांनी आरोग्यपूर्ण रहावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वर गडाडी म्हणाले. मुख्य माहिती दिल्यानंतर डॉ. गडाडी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.