बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून संस्थेस ग्रंथ खरेदी या उपक्रमासाठी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई या संस्थेतर्फे “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास अर्थसाहाय्य” या योजनेंतर्गत मिळालेल्या अनुदानातून विविध विषयांवरील दर्जेदार सुमारे ५०० ग्रंथ खरेदी करण्यात आलेले
असून या ग्रंथ खरेदी उपक्रमाचा कार्यक्रम बुधवार दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११-३० वाजता वाचनालयात आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सदर ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून ते वाचकांसाठी पुढे एक आठवडा खुले राहील.
तसेच जागतिक पुस्तक दिनानिमित्त बुधवार दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५-०० वाजता गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी, बेळगाव येथे प्राचार्य अनिल सामंत, अध्यक्ष, गोवा मराठी अकादमी, गोवा यांचे ‘वाचू आनंदे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, उपाध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड, कार्यवाह सौ. सुनीता मोहिते व सहकार्यवाह अनंत जांगळे यांनी केले आहे.