बेळगाव लाईव्ह :औरंगजेबाची कबर हलवण्याची मागणी योग्य नाही, असे मत मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार आणि केंद्रीय साहित्य अकादमीचे मराठी भाषा संयोजक विश्वास पाटील व्यक्त केले.
ते बेळगावच्या सपना बुक हाऊस यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्र धर्मवीर संभाजी महाराज हे अप्रतिम वीर होते, असे त्यांनी मत व्यक्त केले.
यापूर्वी संभाजीं महाराजाबद्दल लोकांकडे योग्य आणि सत्य माहिती नव्हती. त्यांना अतिशय वाईट रीतीने चित्रित केले जात असे. ‘छत्रपती संभाजी महाराज’ या त्यांनी लिहिलेल्या कादंबरीमुळे लोकांमध्ये जागृती झाली आणि त्यांच्याबद्दल अभिमान वाटू लागला, असे पाटील म्हणाले.
नंतर त्यांनी सपना बूक स्टॉलच्या वाचकांसोबत त्यांच्या पुस्तकांबद्दल चर्चा केली. त्यांनी लिहिलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन चरित्रात्मक कादंबरी ‘महानायक’ची पहिली प्रत साहित्यिक आणि धर्म दत्ती विभागाचे निवृत्त अधिकारी रवि कोटारगस्ती यांना देण्यात आली.
कन्नड साहित्यिक पत्रकार डॉ. सरजू काटकर यांनी बेळगाव येथे आलेल्या विश्वास पाटील यांचे कन्नड साहित्यिकांच्या वतीने स्वागत केले. या चर्चासत्रात नाटककार कादंबरीकार साहित्यिक डॉ. डी. एस. चौगला, बाबुराव नेसरकर, प्रो. घोरपडे यांनी सहभाग घेतला. सपना बुक्सच्या वतीने रघू यांनी स्वागत केले तर युवा कवी नदीम सनदी यांनी आभार मानले.