बेळगाव लाईव्ह :काटा जोड कुस्त्या, नेटके नियोजन, प्रेक्षक बसण्यासाठी विशेष सोय, आवश्यक लायटिंग आणि समलोचकांचा आपसातील समन्वय आदी कारणामुळे सांबरा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
मैदान आयोजनाच्याबाबत सांबरा कुस्ती कमिटीची पाच वर्षातील मजल कौतुकास्पद ठरली आहे. अनेक अंगानी हे मैदान आगळे -वेगळे ठरले.
1986 गावात शेवटचे नंतरचे पहिले मैदान झाले होते. तब्बल 33 वर्षांनी 2019 आली महालक्ष्मी मंदिराच्या लोकार्पणप्रसंगी कुस्ती मैदान भरवण्यात आले. हे मैदान केवळ तीन दिवसात घेण्यात आले होते. त्यावेळी तीन दिवस जे कार्यकर्ते राबले. त्यांना कमिटीत स्थान देण्यात आले. तेव्हाच ठरवण्यात आले की कमिटीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदे नसतील.
सर्वच अध्यक्ष आणि सर्वजण सदस्य असे ठरविण्यात आले. ती परंपरा आजही कायम ठेवण्यात आली आहे. कमिटीने भरवलेला हा पाचवा आखाडा होता. विशेष म्हणजे सलग दोन वर्षे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदाने भरवली. अवघी पाच मैदाने भरवणाऱ्या सांबरा कमिटीचे नियोजन वाखण्याजोगे होते. नियोजनचे शिवधनुष्य कमिटीने यशस्वी पेलले.
काटाजोड कुस्त्यांमुळे मैदानात रंगत निर्माण झाली होती. राष्ट्रीय विजेता आणि पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान गणेश जगताप आणि इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल मिलाद यांच्यात पहिल्या क्रमांकाची लढत लक्षवेधी ठरली. बाराव्या मिनिटाला गणेशने मिलादवर विजय मिळवला. दोन नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बस्सीडोणी विरुद्ध इचलकरंजीचा महाराष्ट्र चॅम्पियन ओमकार भातमारे यांच्यात झाली. त्यात नागराज विजयी झाला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कर्नाटक चॅम्पियन गिरीष दावणगेरी याचा दिल्लीचा मल्ल तेजाने पराभव केला. इतर कुस्त्याही रंगदार झाल्या त्यामुळे प्रेक्षक आखाड्यात ठाण मांडून होते.

मैदानात तब्बल पाच पाच माइक सुरू होते. समलोचकांच्या आपसातील समन्वयामुळे कोणताच गोंधळ न होता मैदान यशस्वीरित्या संपन्न झाले. समलोचनासाठी पहिल्यांदाच बेळगावला आलेल्या प्रशांत चव्हाण यांनी कुस्तीचा इतिहास, लढतीतील डाव-प्रतिडाव, प्रबोधन आदी विवेचन केले. तर यल्लाप्पा हरजी यांनी पाहुण्यांचे स्वागत, गावची कुस्ती परंपरा, तालीम आणि आखाड्याशी संबंधित माहिती दिली. पै. नवीन पाटील यांनी आलेल्या पैलवानांची माहिती दिली.
पैलवानांना पुकार आणि देणगीचे वाचन यासाठी दोन स्वतंत्र माइक होते. पाच माईक कार्यरत असताना आपसी समन्व्ययामुळे कोणतीच गडबड न होता मैदान सुरळीत झाले. उशिरा दाखल झालेल्या हलगी वादकांनी मैदानात रंगत निर्माण केली. पावसाळी वातावरणातही कुस्ती मैदान घेण्याचा चंग बांधला आणि मैदान यशस्वी करून दाखवले. सांबरा कुस्ती कमिटीने केलेले नियोजन वाखण्याजोगे आहे. यल्लाप्पा हरजी, लक्ष्मण सुळेभावी, महेंद्र गोठे, कृष्णा जोई, भुजंग गिरमल, मोहन हरजी, नितीन चिंगळे, भरमा चिंगळे, शितलकुमार तिपान्नाचे, शिवाजी मालाई, भुजंग धर्मोजी, शिवानंद पाटील, सिद्राई जाधव, प्रवीण ताडे, उमेश चौगले, लक्ष्मण जोई, विनायक चिंगळी यांनी मैदान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कमिटीला कै. पै. शिवाजी चिंगळी, मुकुंद मुतगेकर यांचे मार्गदर्शन कमिटीला लाभले. त्याप्रमाणे इरापा जोई, राजू देसाई, नागेश देसाई, शिवाजी जत्राटी, ऍड. रमेश पाटील, लक्ष्मण यड्डी, नागाप्पा चौगले, पुंडलीक जोई, भरमा जक्कन्नावर आदी गावाकऱ्यांचे प्रोत्साहन कमिटीला मिळत आहे.