belgaum

साउथ वेस्टर्न रेल्वे कडून सेवानिवृत्ती निमित्त सुनील आपटेकर सन्मानित

0
40
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आगामी 30 एप्रिल रोजी इंडिया आणि रेल्वे अधिकारी बेळगावचे सुपुत्र सुनील आपटेकर हे सेवानिवृत्त होत आहेत त्या पार्श्वभूमीवर हुबळी येथील केशवपूर भागातील रेल्वे ऑफिसर्स क्लबमध्ये आज रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षकपदी गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत असलेले सुनील आपटेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक सत्यप्रकाश शास्त्री (I.R.T.S.) आणि मुख्य वाणिज्य प्रबंधक प्रवासी वाहतूक अनुपकुमार साधू (I.R.T.S.) व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात डेप्युटी सी.सी.एम. राजीवकुमार झा, डेप्युटी सी.ओ.एम. एन. राजकुमार, सिनिअर डी.ओ.एम. अरविंद हेरले, तसेच हुबळी विभागाचे सिनिअर डी.सी.एम. संतोष हेगडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

वाणिज्य विभागाचे सी.ओ.एस. बेहरा यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करत कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर,सत्यप्रकाश शास्त्री यांनी सुनील आपटेकर यांच्या ३५ वर्षांच्या कार्यकाळाचा मागोवा घेतला आणि त्यांच्या निस्वार्थ, प्रामाणिक सेवेचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, रेल्वे विभाग एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आजवर केलेल्या कामाची पोचपावती हीच आजच्या कार्यक्रमात दिसून येत आहे.

 belgaum

सत्काराला उत्तर देताना सुनील आपटेकर म्हणाले, ध्येय ठरवून प्रामाणिकपणे कार्य केल्यास यश नक्की मिळते. यावेळी त्यांनी, भारतीय रेल्वेचा गौरव व्यक्त केला आणि त्यांचं जीवन सुसंस्कारित करणाऱ्या या संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या समारंभात बेंगळुरू, म्हैसूर, अरसिकेरी, दावणगेरी, बेळ्ळारी, विजयपुर, होस्पेट, बागलकोट, चेन्नई, मुंबई अशा विविध ठिकाणांहून आलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी आपटेकर यांचा सन्मान करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सेवेचा गौरव केला. सेवानिवृत्त समारंभाच्या निमित्ताने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.