बेळगाव लाईव्ह : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दशतवादी हल्ला हा देशावरचा हल्ला आहे केंद्र सरकार जे पाऊल उचलेल त्याला पाठिंबा देणे हा आमचा दृष्टिकोन आहे असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
शुक्रवारी सायंकाळी बेळगाव दौऱ्यावर आले असता माध्यमाने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देताना बोलत होते. जम्मू काश्मीर येथील पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा पर्यटकांवर नव्हे तर देशावर झालेला हल्ला आहे.
तेंव्हा या पद्धतीने जेंव्हा देशावर हल्ला होतो, त्यावेळी आम्हा सर्वांची जबाबदारी आहे की राजकारण बाजूला सारून कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार जे पाऊल उचलेल त्याला पाठिंबा देणे आमचा दृष्टिकोन तसाच असेल या संदर्भात काल गुरुवारी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलवण्यात आली होती.

त्या बैठकीत सर्वानुमते पहेलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आपण राजकारण आणायचे नाही असे ठरले आहे असेही त्यांनी सांगितले.
तसेच संबंधित दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे अशी माहिती देऊन पेहलगाम हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकारने कोणतीही तडजोड न करता कठोर पावले उचलली पाहिजेत. त्यांनी कांही निर्णय घेतले आहेत आता बघूया पुढे काय होतं? असे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार शेवटी म्हणाले.