बेळगाव लाईव्ह :कलामंदिर, टिळकवाडी येथील आधुनिक बहुउद्देशीय व्यापारी संकुलाचे उद्घाटन येत्या 20 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कला मंदिर टिळकवाडी येथे उभारण्यात आलेले आधुनिक व्यापारी संकुल 20 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजता उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. गेल्या सुमारे वर्षभरापासून तयार असलेल्या या नवनिर्मित वाणिज्य इमारतीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या औपचारिक उद्घाटन करणार आहेत.
जुन्या काळातील कला मंदिरचे एका व्यस्त शॉपिंग हब अर्थात बाजारहाट केंद्रामध्ये रूपांतरित करण्याच्या प्रवासाला वर्ष 2010 मध्ये प्रारंभ झाला होता. त्यावेळी सदर जागा एका आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या स्वरूपात विकसित करण्याची योजना आखण्यात आली. ही योजना आता स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत प्रत्यक्षात उतरली आहे.
जिने कला मंदिरच्या जागी आधुनिक व्यापारी संकुलाला जन्म दिला आहे. याची मूळ संरचना बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड सोपवण्यात आली होती आणि 27 मे 2019 रोजी कामाला सुरुवात झाली.
सदर सुमारे 46.68 कोटी रुपये खर्चाच्या या पुनर्विकास परियोजनेला बेंगलोर येथील यांकी कंस्ट्रक्शन कंपनीने मूर्त स्वरूप दिले आहे. या आधुनिक व्यापारी संकुलाची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. रचना : तळघर + तळघर + 2 मजले, तळघर – बहु-स्तरीय कार पार्किंग, तळघर – व्यावसायिक दुकाने, पहिला मजला – दुकाने आणि एक आकर्षक फूड कोर्ट, दुसरा मजला – स्टील रूफिंगसह मल्टीप्लेक्स आणि मीटिंग हॉल लॉबी 2.
सदर 1 एकर (7,800 वर्ग मीटर) मध्ये पसरलेल्या या नव्या आधुनिक व्यापारी संकुलामध्ये पुढील गोष्टी अर्थात सुविधा असतील. मल्टी-लेवल कार पार्किंग सुविधा, मल्टी-मोडल पार्किंग स्टॅन्ड (ऑटो रिक्शा आणि सायकलिंसाठी), आधुनिक शॉपिंग मॉल (ब्रँडेड आणि स्थानिक दुकानांसह), एट्रियम स्पेस (खुले आणि आकर्षक डिझाइन), कौटुंबिक मनोरंजन क्षेत्र आणि रेस्टॉरंट, मिनी ऑडिटोरियम व सांस्कृतिक केंद्र, अन्य सामुदायिक सुविधा.
या व्यापारी संकुलाला फक्त खरेदीसाठीच नाही तर मनोरंजन, सांस्कृतिक आणि सामुदायिक उपक्रमांसाठी एक बहुउद्देशीय स्थळाच्या स्वरूपात विकसित करण्यात आले आहे. हे आधुनिक बहुउद्देशीय व्यापारी संकुल बेळगावच्या विकासातील एक महत्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे.