बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील खणगाव येथे वीज कोसळून १५ वर्षीय अत्सा जमादार या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अत्सा जमादार ही शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आईसोबत शेतात गेली होती.
अचानक विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. दोघी झाडाखाली आसऱ्यासाठी थांबल्या असताना वीज कोसळली. अत्सा या मुलीवर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

एकीकडे पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात आनंद आहे, मात्र या दुर्दैवी घटनेने खणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. वळीव पाऊस आणि विजेचा गरगडाट सुरू असताना शेतात काम करणाऱ्यांनी किंवा बाहेर होणाऱ्याने सांभाळून आम्ही गरजेचे बनले आहे.