सायबर फसवणूक : बेळगावच्या सॉफ्टवेअर इंजिनियरला 1.07 कोटीचा गंडा

0
5
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सायबर गुन्हेगारी बाबत मोठ्या प्रमाणात व्यापक जागृती होत असताना देखील ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा देण्याचे सांगून बेळगाव येथील एका सॉफ्टवेअर इंजिनियरला सायबर गुन्हेगारांनी तब्बल 1.07 कोटी रुपयांना ठकविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

बेळगाव येथील सायबर इकॉनॉमिक अँड नारकोटिक्स (सीईएन) पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार पीडित रजत (नांव बदललेले) याला ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा देण्याचे सांगून सायबर गुन्हेगारांनी त्याला 1 कोटी 7 लाख रुपयांना ठकवले.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीईएन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करत आहेत. याबाबतची माहिती अशी की, वडगाव येथील रजत हा 30 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून स्कॅमर्सच्या संपर्कात आला होता. त्याच्या सांगण्यावरून रजतने प्लेस्टोर मधून अबंसे प्रो हे ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करून एका कंपनीमध्ये सुरुवातीला 15 लाख रुपये गुंतवले होते.

 belgaum

त्याच्या बदल्यात त्याला 7 लाख रुपये नफा देण्यात आला होता. नफ्याचे हे पैसे त्याच्या बँक खात्यावर देखील जमा झाले. त्यामुळे संबंधित ॲपवर त्याचा विश्वास बसला आणि त्याने टप्प्याटप्प्याने तब्बल 1 कोटी 7 लाख रुपये गुंतवले. त्याच्या बदल्यात रजेच्या खात्यावर नफ्या दाखल 11 कोटी रुपये जमा दाखवण्यात आले.

मात्र प्रत्यक्षात खात्यावर पैसे जमाच झाले नसल्यामुळे आपण फसलो गेलो हे लक्षात येताच रजत याने गेल्या 29 मार्च रोजी सीईएन पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. रजत गेल्या जानेवारी महिन्यापासून संबंधित ॲपच्या माध्यमातून पैसे गुंतवत होता.

या संदर्भात बोलताना सीईएन पोलीस निरीक्षक बी. आर. गडेकर यांनी गुंतवलेल्या पैशांचा मोठा परतावा देण्याचे दिशाभूल करणारे वचन देणाऱ्या जाहिरातींना भुलून लोक अशा ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहेत. कोणताही कायदेशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कधीही गुंतवणूकदारांना एखाद्या व्यक्तीच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्यास सांगत नाही. अज्ञात प्लॅटफॉर्मवर व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.