बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्यावतीने बेळगावमधील सीपीएड मैदानावर भरविण्यात आलेल्या ‘संविधान बचाओ’ आंदोलनात मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या भाषणाला सुरुवात होताच भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे निशाण दाखवत मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे भर सभेत गोंधळ निर्माण झाला.
या गोंधळामुळे सभेला उपस्थित आमदार आणि मंत्रीही आश्चर्यचकित झाले. मात्र झालेला हा सर्व प्रकार पाहून मुख्यमंत्र्यांनी थेट व्यासपीठावरूनच पोलीस विभागाच्या ढिसाळ बंदोबस्तावर संताप व्यक्त केला.
भर सभेत सुरु झालेला गोंधळ पाहून मुख्यमंत्री सिध्दरामय्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधीक्षक कोण आहे? असा संतापजनक सवाल उपस्थित करत खडसावले.

व्यासपीठावरील हा प्रकार अनेकांच्या मोबाईलमध्ये, प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. मात्र मुख्यमंत्र्यांचा आवेग लक्षात घेता जाहीर व्यासपीठावरून पोलिसांसोबत केलेले हे वर्तन कसे आहे याबाबत चर्चा समाजमाध्यमांवर सुरु आहे.
तसे पहिल्याच मुख्यमंत्र्यांचे पोलिस अधिकारी भडकणे साहजिकच होते गुप्तचर खात्याने सभा मेळाव्याच्या स्थळी गुप्तचर खात्याने भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना ओळखणे गरजेचे होते मात्र पोलीस अधिकाऱ्याकडूनच चूक झाली असल्याचे देखील बोलले जात आहे.