बेळगाव लाईव्ह : २०१८ मध्ये निवडणूक काळात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह १० जणांचे जबाब आज गुरुवारी बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयात नोंदवण्यात आले.
सन २०१८ मध्ये येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे कुस्ती स्पर्धेदरम्यान दक्षिण आमदारा विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी भिडे गुरुजींसह अन्य ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींसह मारुती परशराम कुगुजी , प्रदीप लक्ष्मण देसाई, विलास मोनाप्पा नंदी, दत्तात्रय गुणवंत पाटील, मधु गणपती पाटील, भोला उर्फ नागेंद्र हनुमंत पाखरे, दुधाप्पा चांगाप्पा बागेवाडी आणि लक्ष्मीकांत नारायण मोदगेकर यांचा समावेश आहे. यामधील परशुराम कुगजी यांचा मृत्यू झाला आहे.
खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असून, आज सर्व आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले. आता 8 एप्रिल रोजी पुढील युक्तिवाद होणार आहे.
आरोपींच्या वतीने ॲड. शामसुंदर पत्तार आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर काम पहात आहेत. यावेळी एडवोकेट मारुती कामानाचे यांच्या सह अन्य वकील देखील उपस्थित होते.