बेळगाव लाईव्ह :मराठा लाईट इन्फंट्रीच्या सेवानिवृत्त माजी जवानांसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे येत्या दि. 5 ते दि. 8 मे 2025 या कालावधीत सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क (एसडी) या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर भरती मेळाव्यासाठी पुनर्रनांव नोंदणी प्रसंगी सोल्जर जनरल ड्युटी पदासाठी उमेदवाराचा मागील सेवेतील सेवानिवृत्तीचा काळ 2 वर्षा आतील आणि सोल्जर क्लार्क (एसडी) पदासाठी तो 5 वर्षा आतील असावा.
त्याचप्रमाणे उमेदवाराचे वय सोल्जर जनरल ड्युटी पदासाठी 46 वर्षाखालील आणि सोल्जर क्लार्क (एसडी) पदासाठी 48 वर्षाखालील असले पाहिजे. तरी सदर भरती मेळाव्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे दि. 5 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता हजर रहावे असे आवाहन एमएलआयआरसीचे लेफ्ट. कर्नल /मेजर, जेसीओ -1 (प्रशिक्षण) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.