‘वंदे भारत’ साठी धारवाड -बेळगाव दरम्यान बर्म्युडा ट्रँगल?

0
7
Vande bharat
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पुण्याहून हुबळीपर्यंत बेळगाव मार्गे सुरळीत धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला त्याच मार्गाने धारवाडहून बेळगावपर्यंत येण्यास कशी काय अडचण निर्माण होत आहे? याचे गुढ ‘बर्म्युडा ट्रँगल’ प्रमाणे कायम असून भारतीय रेल्वेच्या या आधुनिक उरफाट्या भौतिकशास्त्राबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच बेळगावहून बेंगलोर, हुबळीला वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईपर्यंत पुणे ते हुबळी वंदे भारत सेवा बंद करावी, असा सल्ला देण्याबरोबरच तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

पुण्याहून येणारी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे बेळगाव मार्गे हुबळीपर्यंत सहज सुलभतेने जाऊ शकते. तथापी जेंव्हा त्याच वंदे भारताचा विस्तार धारवाडहून बेळगावपर्यंत करण्याचा विचार येतो, तेंव्हा ते ‘अव्यवहार्य’ आहे. या पद्धतीने भारतीय रेल्वेच्या सौजन्याने आधुनिक भौतिकशास्त्रातील एक नव्हे रहस्य नुकतेच पुन्हा लिहिली गेले आहे. धारवाडहून बेळगाव जाताना रेल्वे रूळ जादूने गायब होऊ शकतात का? किंवा कर्नाटकातील रेल्वे मार्गाच्या जाळ्यामध्ये हा एक गुप्त बर्म्युडा ट्रँगल आहे का? भारतीय रेल्वेची ही नवीनतम गोंधळात टाकणारी कृती प्रवाशांमध्ये संताप निर्माण करणारी ठरत आहे.

दरम्यान या संदर्भात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “अगदी बरोबर.. रेल्वेसाठी बेळगाव हे बर्म्युडा ट्रँगल बनले आहे!” अशी टिप्पणी एका नेटकऱ्याने केली आहे. सर्वात उत्तम उपाय म्हणजे काहीही होऊ दे पुणे ते हुबळी वंदे भारत सेवा बंद करावी. असे झाले तरच रेल्वे खाते किंवा रेल्वे मंत्रालय बेळगावहून बेंगलोर, हुबळी वंदे भारत सेवा सुरू करेल, असा सल्ला एकाने दिला आहे. फेसबुक आणि इतर माध्यमांवर या पद्धतीची वैयक्तिक टिप्पणी केल्यामुळे समस्येचे निवारण होणार नाही. त्यासाठी एकच मार्ग म्हणजे सर्वांनी संघटित होऊन एक संयुक्तिक कार्यक्रम आखला पाहिजे, तरच एखादी फलनिष्पत्ती होऊ शकते अन्यथा सातत्याने फक्त टिप्पणी करत बसल्यास काहीच घडणार नाही असे मत दुसऱ्या एका नेटकर यांनी व्यक्त केले आहे. तर एकाने ‘यासाठीच खासदार स्थानिक निवडावा..’ असे सूचक वक्तव्य केले आहे.Vande bharat

 belgaum

कदाचित वेळेची कमतरता असेल असे नमूद करून अन्य एकाने धारवाड-बेळगाव विभागात अनेक वळणे असल्यामुळे रेल्वेचा वेग कमी होतो. तावरगट्टी -लोंढा (535-559) विभागात जास्तीत जास्त परवानगीयोग्य वेग ताशी 65 कि.मी. आहे.

लोंढा येथून जाण्यासाठी स्वतः 10 मिनिटे लागतात. गुंजी ते लोंढा 65 कि.मी. ताशी (559-569) पुन्हा खानापूर ते देसूर 70 कि.मी. ताशी (589-598). रेल्वे बेळगाव येथे येऊन एक तास थांबल्यानंतर पुन्हा जाते. या हालचालीसाठी किती वेळ लागेल असे तुम्हाला वाटते? सध्या ही रेल्वे एसबीसी येथून 5:45 वाजता निघते आणि राउंड ट्रिप करत संध्याकाळी 07:30 वाजता पोहोचते. याबाबत तुमच्या काय सूचना आहेत? वेळेची कुठे तडजोड करता येईल? असा सवाल केला आहे.

मंगळूर -मुडगाव वंदे भारत रेल्वे सेवा देखील बेळगावपर्यंत सहज वाढवता येते. कारण दररोज 35 हून अधिक बसेस धावतात. रेल्वे मुडगावला दुपारी 1 वाजता पोहोचते आणि संध्याकाळी 6 वाजता मुडगावहून निघते. त्यांना काही सैद्धांतिक समस्या असू शकतात पण जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग असतो, असे मत एका नेटकऱ्याने व्यक्त केले असून दुसऱ्याचे “बेळगाव मार्गे बेंगलोर मार्गे मुंबई अशी वंदे भारत सुरू करा” असे म्हणणे आहे. धारवाड ते बेळगाव अशा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवेसंदर्भात अशा असंख्य प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.