बेळगाव लाईव्ह :भरधाव मालवाहू वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकल वरील पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना गेल्या शनिवारी रात्री 8:15 वाजता अलारवाड क्रॉस जवळ घडली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचे नावे तवनाप्पा पारीस जनगौडा (वय 55) आणि भारती तवनाप्पा जनगौडा (वय 49, दोघे मूळचे रा. अलारवाड, सध्या प्लॉट नं. 103, गोपाळ आर्केड, शांतादुर्गा अपार्टमेंटजवळ गुरुवार पेठ, टिळकवाडी) अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मालवाहू टेम्पो (क्र. केए 69 -0371) हालगा गावाकडून सर्व्हिस रोड मार्गे भरधाव वेगाने बेळगावकडे निघाला होता. त्यावेळी जनगौडा दांपत्य आपल्या मोटरसायकल (क्र. केए 22 ईडी 5728) वरून अलारवाडकडून बेळगावकडे निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली.
सदर अपघातात मोटरसायकल वरील दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे याप्रकरणी रहदारी उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.