बेळगाव लाईव्ह :एंपियर बाय ग्रेवीस इलेक्ट्रिक मोबिलिटी या कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या मेक इन इंडिया, डिझाईन इन इंडिया, मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया असलेल्या रिओ प्लस, मॅग्नस निओ आणि नेक्सस या अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर्स बेळगावच्या यश ऑटो या दुचाकी शोरूमने बाजारात आणल्या असून या टू व्हीलर्सना ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
सदर इलेक्ट्रिक दुचाकींसंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना यश ऑटो शोरूमचे मालक शिवसंत संजय मोरे यांनी सांगितले की, एंपियर बाय ग्रेवीस इलेक्ट्रिक मोबिलिटी या कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली मेक इन इंडिया, डिझाईन इन इंडिया, मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया अशी ही ‘नेक्सस’ दुचाकी आहे.
या दुचाकीचा वेग ताशी 93 कि.मी. इतका असून ही एकदा चार्ज केल्यानंतर 136 कि. मी. धावू शकते. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे हिला ॲडव्हान्स टच स्क्रीन मीटर बसवण्यात आले आहेत. ज्यामध्ये ब्लूटूथ, नेव्हीगेशन, जीपीएस असे सर्व ॲडव्हान्स फीचर्स उपलब्ध आहेत. पियानो फिनिश बटन असलेल्या या गाडीची सीट अर्थात आसन लांब प्रशस्त आहे.
रिव्हर्स मोड असलेल्या या गाडीमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा आहे गाडीचे स्टोरेज (डिकी) 33 मीटर इतकी मोठी आहे. गाडीला मिडमाऊ पीएमएस मोटर दिली असून गेअर बॉक्स देण्यात आला आहे. टायर्स 12 इंची असलेल्या या गाडीवर तुम्हाला एकही स्क्रूबोर्ड नजरेस पडणार नाही अशी माहिती देऊन नेक्सस स्कूटरला लीडर ऑफ ईव्ही असे म्हटले जाते असे मोरे यांनी सांगितले.
रिओ प्लस दुचाकीबद्दल बोलताना नोंदणी करावी न लागणारी अनरजिस्टर्ड अशी ही गाडी आहे, जी
एकदा चार्ज केल्यानंतर 75 कि.मी. धावते. संथ गतीने धावणारी गाडी असल्यामुळे ही युवा पिढी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य आहे, असे संजय मोरे यांनी सांगितले. मॅग्नस निओ इलेक्ट्रिक दुचाकी एकदा चार्ज केल्यानंतर 118 कि.मी. धावते. ताशी 65 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या गाडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे गाडीची बॅटरी वॉरंटी 75,000 कि.मी. किंवा 5 वर्षे इतकी आहे.
ही बॅटरी 2.3 किलोवॅटची असून नव्याने बाजारपेठेत आलेली ही गाडी आहे. लॉंगर सीट व बिग स्टोरेज असलेल्या या गाडीला रिव्हर्स मोड आहे. मोबाईल चार्जिंग सुविधा आहे. युवा पिढीच्या निश्चितपणे पसंतीला पडेल अशी ही गाडी असल्याचा विश्वास यश ऑटो शोरूमचे मालक शिवसंत संजय मोरे यांनी व्यक्त केला.