belgaum

जागतिक सामाजिक कार्य दिनी सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव

0
31
Huli
 belgaum

बेळगाव लाईव्ह :”अनेकांचा जन्म हा जणू समाजकार्यासाठीच झालेला असतो. ते रात्रंदिवस समाजासाठी झटत असतात अशा समाजसेवकांना हेरून संजीवीनीने आज जो मानसन्मान केला तो प्रशंसनीय” असल्याचे मत प्रसिद्ध आर्किटेक्ट बिल्डर आर एम चौगुले यांनी व्यक्त केले.

दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी जगभरात सामाजिक कार्य दीन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याचे औचित्य साधत संजीवीनी फौंडेशनच्या वतीने थोर समाजसेवक पद्मप्रसाद हुली यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती पद्मप्रसाद हुली चेअरमन आणि सीईओ मदन बामणे होते.उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कारमूर्तींचा परिचय मिथाली कुकडोळकर यांनी करून दिला.प्रास्ताविक करीत असताना मदन बामणे यांनी पद्मप्रसाद हुली यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.

 belgaum

पद्मप्रसाद हुली हे उत्कृष्ट जलतरणपटू असून त्यानी पोहण्याचा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. ते राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजते आहेत. त्याचा उपयोग आजही ते समाजासाठी करीत आहेत एखादा व्यक्ती विहिरीत नदीत किंवा समुद्रात जरी अडकला असेल तर त्याला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करतात तसेच वेगवेगळ्या दुर्घटनेत पाण्यात अडकलेले मृतदेह शोधण्याचे कामही ते करतात, समृद्ध अंध संस्थेच्या माध्यमातून ते अंध व्यक्तींसाठी मदत करीत असतात.
कोव्हीड काळात त्यांनी अनेक कुटुंबाना रेशन किटचा पुरवठा केला होता.

प्रत्येक महिन्याला बेळगाव शहरातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्याचे कामही ते करीत असल्याचे सांगत त्यांना उर्वरित भावी आयुष्यातही असेच समाजासाठी झटत रहा असा शुभसंदेश बामणे यांनी दिला.

Huli
त्यानंतर प्रमुख पाहुणे आर एम चौगुले आणि मदन बामणे यांच्याहस्ते शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
पद्मप्रसाद हुली यांनी सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असताना या सत्कारामुळे समाजसेवा करण्यासाठी पुन्हा प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता सिद्दी यांनी केले तर आभार कावेरी लमाणी यांनी मानले.
या कार्यक्रमास संस्थापिका डॉ सविता देगीनाळ, संचालिका रेखा बामणे, सल्लागार प्रीती चौगुले, विद्या सरनोबत, संजय पाटील, प्रदीप चव्हाण लता बायाण्णाचे,मेघा चौगुले,हुली कुटुंबीय तसेच संजीवीनी फौंडेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.