बेळगाव लाईव्ह : श्रीशैल मल्लिकार्जुन यात्रेसाठी बेळगाव विभागीय परिवहन महामंडळाने अतिरिक्त वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
2025 सालच्या श्री क्षेत्र श्रीशैल मल्लिकार्जुन यात्रेच्या निमित्ताने अथणी, रायबाग, गोकाक, चिक्कोडी, संकेश्वर आणि निपाणी येथून विशेष वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
गोकाक-श्रीशैल आणि अथणी-श्रीशैल मार्गावर ऑनलाईन बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, या वाहतुकीत श्रीशैलच्या दर्शनासोबतच, कुडलसंगम, बादामी, मंठाळ, महानंदी आणि बसवकल्याणसारख्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी यात्रेकरूंना मिळणार आहे.
पायी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांसाठी श्रीशैलहून परतीसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. चिक्कोडी विभागीय परिवहन नियंत्रण अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.