Thursday, March 20, 2025

/

सांबरा कुस्ती दंगल… तारीख ठरली

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील सांबरा येथे आयोजित कुस्ती आखाड्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धाराच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रविवार दि.13 एप्रिल रोजी कुस्ती आखाडा भरवण्याचा निर्णय कुस्ती कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. आखाडा भरवण्यासंदर्भात मंगळवारी कुस्ती कमिटीची बैठक साई जीम येथे झाली. अध्यक्षस्थानी लक्ष्मण सुळेभावी होते.

मारुती गल्ली येथील श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून 50 वर्षे पूर्ण झाल्याने दि 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त भव्य कार्यकामांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा निमित्त दि. 13 एप्रिल रोजी कुस्ती आखाडा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मैदान भरवण्याच्या जागेबाबत चर्चा करण्यात आली. गावमर्यादित कुस्त्या भरवून नव्या पिढीला प्रेरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. देणगी जमा करणे, नामवंत मल्लाना पाचरण करणे यासह नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.Sambra kusti

यल्लाप्पा हरजी, भरमा चिंगळी, महेंद्र गोठे यांनी विचार मांडले. यावेळी शीतलकुमार तिप्पाण्णाचे, नितीन चिंगळी, मोहन हरजी, शिवाजी मालाई, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, भुजंग धर्मोजी, कृष्णा जोई, सिद्राई जाधव, विनायक चिंगळी, प्रवीण ताडे यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे सदस्य उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.