बेळगाव लाईव्ह :सांबरा येथे गुढीपाडवा पारंपरिकरित्या अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त श्री बसवण्णा देवाची यात्रा धार्मिक कार्यक्रमात पार पडली.
गावातील प्रमुख मार्गांवरून आंबिल गाडे आणि चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली.
येथील श्री बसवण्णा मंदिरात सकाळी अभिषेक, महापूजा आणि इतर धार्मिक विधी करण्यात आले.
यात्रेनिमित्त बसवण्णा मंदिर कमिटीने आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या. मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी दिसून आली.
भाविकाकडून देवाला वस्त्र, श्रीफळ, आंबील गुगऱ्या अर्पण करण्यात आल्या. यात्रेनिमित्त दुपारनंतर पारंपरिक वाद्याच्या गजारात आंबिल गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली.
तसेच सजावलेल्या बैलजोड्यानी मंदिराना प्रदक्षिणा घालण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. सायंकाळी चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्याच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणूक अबालवृद्ध सहभागी झाले होते.