रमजानच्या खरेदीसाठी बाजारपेठ गर्दीने फुलली

0
6
Ramzan month
 belgaum

बेळगाव लाईव्ह : रमजानचा महिना म्हटला की खास असते ती खाद्यसंस्कृती! समोसे, कबाब, बिर्याणी, शीरखुर्मा, खास रमजान सरबत, आणि विविध फ्लेव्हर्समधील फिरनी यांचा आस्वाद यासाठी रेलचेल सुरु असते. अवघ्या दोन दिवसांवर मुस्लिम बांधवांकडून साजऱ्या केल्या जाणाऱ्या रमजान निमित्त बेळगावमधील खडेबाजार, दरबार गल्ली परिसर गर्दीने फुलून गेला आहे. या भागातील सुप्रसिद्ध दुकाने आणि स्टॉल्सवर खाद्यप्रेमींची गर्दी दिसून येत आहे.

रमजान महिना सुरू झाल्याने बेळगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. दरबार गल्ली, खडेबाजार आणि मध्यवर्ती भागात विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत दुकाने खुली राहात असल्याने बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

रमजानच्या निमित्ताने मुस्लिम बांधव उपवास करत असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या ड्रायफ्रूट्स, खजूर, बदाम, अंजीर, बेदाणे, काजू यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांसाठीही नागरिकांची झुंबड उडत आहे. रमजानसाठी विशेष कपडे, नवीन फॅशनचे कुर्ते, शेरवानी आणि महिलांसाठी खास ड्रेस मटेरियल्सची मागणी वाढली आहे.Ramzan month

 belgaum

शिवणकामासाठी दुकानांमध्ये मोठ्या रांगा लागत असून, बेळगावसह खानापूर, चंदगड आणि बैलहोंगल येथून खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

रमजानच्या निमित्ताने व्यापाऱ्यांसाठीही हा काळ सुवर्णसंधी ठरत आहे. खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साह आहे. खाद्यपदार्थ विक्रेते, ड्रायफ्रूट विक्रेते तसेच कपड्यांच्या दुकानदारांनी या सिझनमध्ये मोठा व्यवसाय केला असून रमजानचा महिना जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे बाजारपेठांतील उत्साह अधिकाधिक वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.