बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या होलसेल भाजी मार्केटमध्ये सध्या कोबीजचा दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांवर कोबीजचे आपले उभे पीक शेळ्या -मेंढ्यांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे.
बेळगावच्या भाजी मार्केटमध्ये गेल्या कांही दिवसांपासून कोबीज पिकाचे दर खूप घसरले आहेत. कोबीजला व्यापाऱ्यांकडून कवडीमोल किंमत दिली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मोठ्या कष्टाने घाम गाळून काढलेल्या पिकाला वाहतुक व मजुरीचा खर्च निघेल इतकाही दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
त्यामुळे कांही शेतकऱ्यांनी गाडी भाडे व मजुरी देऊन आपल्या शेतातील कोबीज बेळगावच्या होलसेल भाजी मार्केटमध्ये घेऊन जाण्याऐवजी शेतातच मातीमोल होणे पसंत केले आहे. कडोली येथील कांही शेतकऱ्यांनी तर कष्टाने उगवलेले हातात तोंडाशी आलेले कोबीज वाया जाऊ नयेत.
ते किमान मुक्या जनावरांच्या कामी यावे म्हणून शेतातील उभ्या पिकात शेळ्या -मेंढा चरावयास सोडणे पसंत केल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.