बेळगाव लाईव्ह : बेळगाव वडगाव येथील रहिवास जयदीप बिर्जे आणि सोनाली बिर्जे यांची अभिनंदनीय निवड झाली आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज दिल्लीतर्फे आयोजीत इंडो -जर्मन बिझनेस पार्टनरशिप प्रोग्रॅम -2025 कार्यक्रमांमध्ये “इंडस्ट्री 4.0 बॅच 2025” अंतर्गत बेळगावच्या लिओ इंजिनियर्सचे मालक सीईओ जयदीप बिर्जे यांची, तर “जनरल बॅच 2025” साठी त्यांच्या पत्नी लिओ इंजिनियर्सच्या मॅनेजिंग पार्टनर सौ. सोनाली बिर्जे यांची कर्नाटक राज्यातून अभिनंदनीय निवड झाली आहे.
लिओ इंजिनियर्सचे मालक असणारे हे बिर्जे दांपत्य मार्च महिन्याच्या अखेरीस इंडो -जर्मन बिझनेस पार्टनरशिप -2025 प्रोग्रॅम अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी जर्मनी येथे रवाना होणार आहे.
विशेष म्हणजे जर्मनीत प्रशिक्षण घेण्याच्या या सुवर्ण संधीसाठी कर्नाटक राज्यातून फक्त जयदीप आणि सोनाली यांचीच निवड झाली आहे.
सदर यशाबद्दल या उभयतांचे सर्वत्र कौतुक होत असून औद्योगिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


