बेळगाव लाईव्ह :भारतीय लष्कराच्या 161 एमईडी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत नारायण गल्ली, कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) येथील महेश मनोहर पाटील यांना नायब सुभेदार पदावर पदोन्नती मिळाली आहे.
कंग्राळी खुर्द येथील रहिवासी असणारे नायक सुभेदार महेश मनोहर पाटील हे गेल्या 3 नोव्हेंबर 2003 रोजी भारतीय लष्कराच्या सेवेत रुजू झाले.
लष्कराच्या तोफखाना विभागात म्हणजे 161 एमईडी रेजिमेंटमध्ये गेल्या 22 वर्षापासून देश सेवा करणाऱ्या महेश पाटील यांनी आपल्या सेवाकाळात सेना मेडल, शौर्य पदक, बेस्ट लीडर वगैरे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
हवालदार पदावर कार्यरत असताना महेश पाटील यांनी लीडरशिप अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर जेसीओ परीक्षेत उत्तीर्ण होत आता नायक सुभेदार हे मानाचे पद संपादन केले आहे. फरीदकोट, पंजाब येथील 161 एमईडी रेजिमेंटच्या कार्यालयामध्ये नुकत्याच पार पडलेल्या समारंभात त्यांना हे पद बहाल करण्यात आले.
या पद्धतीने कर्तृत्व सिद्ध करत नायक सुभेदार पद संपादन केल्याबद्दल महेश मनोहर पाटील यांचे त्यांच्या रेजिमेंटसह गावात सर्वत्र अभिनंदन होत आहे.