बेळगाव लाईव्ह :मंत्री के. एन. राजण्णा यांच्यासह 48 नेते हनीट्रॅप झाले आहेत. हे कर्नाटकमध्ये सुरू झाले आहे आणि कर्नाटकातच समाप्त झाले पाहिजे, असे स्पष्ट मत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केले.
मंत्री राजण्णा यांनी अधिवेशनामध्येच त्याबद्दल सांगितले हे चांगले झाले. मात्र तक्रार दाखल करून स्वतःचा आरोप स्वतः सिद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. माझ्यामते 40 नवे 400 जण हनीट्रॅप झाल्याची शक्यता आहे.
चाळीसच्या पुढे आणखी एक शून्य वाढल्यास आश्चर्य नाही. केवळ आपल्या राज्यातील नेतेच नाहीतर दिल्ली येथील नेते आणि अधिकारी देखील हनीट्रॅपला बळी पडले आहेत, असे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.
गेल्या 20 वर्षापासून हनीट्रॅप होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्याला आळा घातला गेला पाहिजे. बिचारे अनभिज्ञ असलेले दिल्लीतील नेते या हनीट्रॅपला बळी पडले आहेत.
सर्वपक्षीय नेत्यांना हनीट्रॅप केले जात आहे. हनीट्रॅप करून संबंधित मंत्र्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवले जात आहे. त्यांना स्वतःला हवे तसे फसवले जाते, मुख्यमंत्र्यांना भीती दाखवली जाते, अधिकाऱ्यांना भीती दाखवून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात असा आरोपही मंत्री जारकीहोळी यांनी केला.
तसेच याच्या विरोधात सरकारने शक्य तितक्या लवकर पावले उचलली पाहिजेत. कर्नाटकमध्ये हनीट्रॅप प्रारंभ झाला आहे तो कर्नाटक मध्येच समाप्त झाला पाहिजे अशी मागणी करणाऱ्या मंत्री राजण्णा यांनी त्या संदर्भात रीतसर तक्रार नोंदवल्यास सत्य काय आहे? ते सर्वांसमोर येईल, असेही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.