बेळगाव लाईव्ह: आपल्या पिळदार शरीर यष्टीचे दर्शन घडवत जिल्ह्यातील अनेक नामवंत बॉडी बिल्डरनी हनुमान स्पोर्ट्स क्लब हिंडलगा आणि बीडीबीबीए अँड एस आयोजित जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सहभाग दर्शवला होता.
एस एस एस फाउंडेशनच्या उमेश गंगणे याने आपल्या शरीर यष्टीचे दर्शन घडवत बेस्ट पोझर हा किताब मिळवला तर रुद्र जीम च्या महेश गवळी यांने हिंडलगा श्री 2025 हा किताब पटकावत सदर जिल्हा स्तरीय स्पर्धा गाजवली.
यावेळी हिंडलगा गाव मर्यादित आणि जीम मर्यादित बॉडी बिल्डिंग स्पर्धा देखील घेण्यात आली. जिम मर्यादित प्रदेश प्रतीक पाटील हा विजेता ठरला तर बसप्पा कोनेकरी याने बेस्ट पोझर हा किताब मिळवला. हिंडलगा मर्यादित बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दीपक गावडे याने किताब पटकावला तर तुषार गावडे हा बेस्ट पोझर ठरला.
यावेळी जिल्हास्तरीय स्पर्धेतील विविध गटात पाच बॉडी बिल्डर विजेते ठरले त्यांनाही पारितोषिके देण्यात आली. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर यांनी स्पर्धा भरवण्यासाठी विशेष आर्थिक मदत दिली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय सुंठकर, महेश सातपुते,राजेश लोहार,अनिल अंबरोळे, विजय चौगुले चेतन तशिलदार, संतोष सुतार सुनील बोकडे अनंतप्रधान बाबू पावशे सुनील चौधरी आदींनी पंच म्हणून काम पाहिले. स्टेज मार्शल म्हणून राजू पाटील सोमनाथ हलगेकर दीपक चित्रकर प्रवीण कणबरकर यांनी काम पाहिले.
बेळगाव जिल्ह्यातील शेकडो नामवंत बॉडी बिल्डरने या स्पर्धेत सहभाग घेतला होता गेल्या महिन्याभरातील बेळगावत घेतलेली बीडीबीएची ही दुसरी स्पर्धा आहे.