बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील आनंदवाडी कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या आनंदवाडी आखाड्या रंगलेल्या कुस्तीच्या दंगलीत भारतीय पैलवानच भारी ठरले आहे.बुधवारी रात्री हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय कुस्त्या संपन्न झाल्या.
बेळगांव जिल्हा कुस्तीगीर संघटना यांच्यावतीने ठेवण्यात आलेल्या महाकुस्ती पै.प्रडीला (दक्षिण अमेरिका,) विरुद्ध पै शिवा ऊर्फ रवी चव्हाण (महाराष्ट्र) यांच्यातील लढतीत “बेळगावचा रणवीर किताबचा मानकरी पै शिवा ऊर्फ रवी चव्हाण यांनी एकरीखच या डावावर चित करत विजय प्राप्त केला. पै.सोहेल(इराण) विरुद्ध पै.प्रकाश बनकर याच्याविरुद्ध झालेल्या “बेळगाव केसरी” किताबासाठी झालेल्या कुस्ती लढतीमध्ये पै.प्रकाश बनकर गुणावर विजय झाला या आखाड्यात भारतीय पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पैलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले.
याबरोबर झालेल्या बेळगावला शौर्य किताबा साठीच्या झालेल्या लढतीत पै. हादी इराण विरुद्ध पै दादा शेळके (महाराष्ट्र) लढतीत “बेळगावचा शौर्यच्या किताबचा मानकरी पै दादा शेळके (महाराष्ट्र) विजयी ठरला.
महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध विशाल हरियाणा यांच्यात झालेल्या कुस्तीत विशाल हरियाणा याने डावछडी डावावर सिकंदर शेख याला चित करत “बेळगावचा मल्लसम्राट या किताबचा मानकरी ठरला.
बेळगांव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित महाकुस्ती दंगलमध्ये जगभरातील 2 देशांमधून आलेल्या नामवंत पैलवानांना पराभूत करत कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. आपल्या बेळगाव तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पैलवान येणार असल्यामुळे आज मैदाना खचाखच भरले होते. हजारो कुस्तीप्रेमींची हजेरी होती . 2 देशांच्या या स्पर्धेत भारत, इराण, आणि अमेरिका देशाचे खेळाडू सहभागी झाले होते. रणवीर हवाळे कोल्हापूर यांच्या हलगीच्या आवाजने मैदान दुमदुमले होते.
कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, भारत अमेरिका अणि ईरान देशांतून आलेले कुस्तीपटू आणि पाच हजारपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावली. महिला कुस्तीमध्ये बेळगाव तालुक्यातील कडोलीची कन्या स्वाती पाटील हिने हरियाणाच्या पैलवान महिला चितपट केले तर कंग्राळी गावचा पैलवान प्रेम जाधव याने कोल्हापूर गंगावेस तालीमचा पैलवान संकेत पाटील यांना आसमान दाखवले.
ज्या बेळगावात पैलवान सतपालला हरिश्चंद्र बिराजदार मामानी लावले होते त्याच बेळगावात पैलवान सिकंदर शेख याला विशाल हरियाणा ने हरवत इतिहास रचला आहे असे वक्तव्य बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्ष सुधीर बिरजे यांनी माध्यमांशी बोलताना केले. एकूण एवढीच आखाड्यात ९० कुस्त्या सह एक महिला आणि देवा थापा यांची एक मनोरंजनात्मक कुस्ती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.