Friday, February 21, 2025

/

वॉर वौंडेड फाउंडेशनच्या मेळाव्याला दिमाखात प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :देश संरक्षणार्थ युद्धात गंभीर जखमी होऊन अपंगत्व आलेल्या वीर जवानांसाठी कार्यरत वॉर वौंडेड फाउंडेशनतर्फे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या सहकार्याने आयोजित युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या दक्षिण भारतातील पहिल्या मेळाव्याचा शानदार उद्घाटन समारंभ आज मंगळवारी सकाळी उत्साहात पार पडला.

मराठा लाईट इन्फंट्री च्या शरकत सभागृहामध्ये वॉर वौंडेड फाउंडेशनचे (डब्ल्यूडब्ल्यूएफ) अध्यक्ष निवृत्त लेफ्टनंट जनरल असिफ मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर जनरल सी. डी. सावंत, दक्षिणेचे प्रादेशिक संचालक निवृत्त ब्रिगेडियर संदीपकुमार व एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आल्यानंतर प्रास्ताविकात बेळगावात आयोजित केलेल्या या मेळाव्याचा मुख्य उद्देश युद्धात अपंगत्व आलेल्या सर्व सैनिकांपर्यंत पोहोचणे त्यांच्या गतिशीलतेचा विकास, कौशल्य विकास साधने हा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात निवृत्त मेजर जनरल सी. डी. सावंत म्हणाले की, भारतीय सेनेमध्ये अतिउत्कृष्ट अतुलनीय कामगिरीबद्दल जी सन्मान पदके दिली जातात त्यामध्ये त्यामध्ये सर्वात उत्तम ते पदक आहे ज्या पदकाकडे पाहून पाहणाऱ्याची आणि परिधान करणाऱ्याची मान अभिमानाने वर होते, छाती फुलून येते ते पदक म्हणजे लाल व सफेद पदक होय जे सध्या येथे उपस्थित असलेल्या डब्ल्यूडब्ल्यूएफच्या सदस्यांनी ते मोठ्या गर्वाने परिधान केले आहे. उपस्थित सैनिकांनी परिधान केलेल्या लाल रंगाच्या जर्सीवरील डिसेबल्ड वॉरियर ही अक्षरे आपल्याला खटकल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही डिसेबलड नसून विशेष सक्षम व्यक्ती आहात सांगून सावंत यांनी त्यासंदर्भात परदेशात अपंगत्व आलेल्या व्यक्तींना कसे दृढनिश्चयी समजले जाते याचे एक उदाहरण दिले. उपस्थित डब्ल्यू डब्ल्यूएफचे सदस्य देखील दृढनिश्चयाच्या जोरावरच आपल्या अपंगत्वावर मात करून अभिमानाने गर्वाने आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या जर्सी वरील ‘डिसेबल्ड वॉरियर’ ही अक्षरे काढून टाकावीत त्याऐवजी ‘दृढनिश्चयी सैनिक’ ही अक्षरे लिहावीत. त्यामुळे लोकांना कळेल की तुमचा निश्चय किती दृढ, कठीण आहे. यावरून मला प. पु. गुरुगोविंद सिंग यांचे ‘निश्चयकर अपनी जीत करो’ हे सर्वांसाठी उच्चारलेले वाक्य आठवते.War wounded

युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांनी देखील निश्चय केला होता की आपले जे अपंगत्व आहे, जी विशेष क्षमता आहे त्यावर आम्ही निश्चितपणे मात करू आणि ते त्यांनी करून दाखवले आहे. यासाठी तुम्हा सर्वांचे खास अभिनंदन करतो असे सांगून लष्कर, हवाई दल, नौदल आणि कोस्टगार्ड यांच्यासाठी कार्यरत वाॅर वौंडेड फाउंडेशनची व्याप्ती त्याहून अधिक वाढली पाहिजे. त्यासाठी बीएसएफ, सीआरपीएफ, आरटीबीपी वगैरे विभागांनाही सामावून घेतले गेले पाहिजे. ज्यामुळे फाउंडेशनला मिळणाऱ्या निधीतही वाढ होईल, असे मत निवृत्त मेजर जनरल सी. डी. सावंत यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी देखील समायोजित विचार व्यक्त केले अखेर निवृत्त लेफ्टनंट जनरल असिफ मिस्त्री यांच्या अध्यक्षीय भाषणे समारंभाची सांगता होऊन मिळाव्याला प्रारंभ झाला.

उद्घाटन समारंभास लष्कराचे आजी-माजी अधिकारी निमंत्रित मान्यवर हितचिंतक आणि युद्धात अपंगत्व आलेले देशाच्या विविध भागातील 120 वीर सैनिक उपस्थित होते. लाल जर्सी परिधान करून उपस्थित असलेले हे वॉर वौंडेड फाउंडेशनचे सर्व सदस्य साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.