बेळगाव लाईव्ह : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) येथे “पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान बदलासाठी अनुकूलन रणनीती” या विषयावर १३ आणि १४ फेब्रुवारीदरम्यान दोन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
व्हीटीयूच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे आणि बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने ही परिषद होत आहे.
गुरुवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार असून, रशियन अकादमीच्या पेट्रोजवोडस्क वॉटर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. फिलाटोव निकोलाय निकोलायेविच प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. विद्याशंकर एस.हे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
परिषदेत कॅनडाच्या इनलँड वॉटर रिसर्चचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सी.आर. मूर्ती, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. बी. शिवलिंगय्या, व्हीटीयूचे कुलसचिव प्रा. बी.ई. रंगस्वामी, मूल्यांकन कुलसचिव प्रा. टी.एन. श्रीनिवास, तसेच वित्त अधिकारी डॉ. प्रशांत नायक उपस्थित राहणार आहेत.
ही परिषद दोन दिवस चालणार असून यात १०० हून अधिक विषयतज्ज्ञ, संशोधक आणि प्राध्यापक सहभागी होणार आहेत. हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या अनुषंगाने विविध तज्ज्ञ आपल्या संशोधन विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.