बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा दुसऱ्या टप्प्यातील दीक्षांत समारंभ ८ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजिण्यात आला आहे. यामध्ये पदव्युत्तर आणि संशोधन पदवी प्रदान केल्या जातील. सदर समारंभ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृह, ‘ज्ञानसंगम’, व्हीटीयू, बेळगाव येथे सकाळी ११ वाजता आयोजिण्यात आला आहे.
व्हीटीयूच्या २४ व्या वार्षिक दीक्षांत समारंभाच्या दुसऱ्या भागात ७१९४ एमबीए (४९४७ + २२४७ स्वायत्त महाविद्यालयांमधून), ३७८४ एमसीए (२६४८ + ११३६ स्वायत्त महाविद्यालयांमधून),
१३१३ एम.टेक. (४७७ + ८३६ स्वायत्त महाविद्यालयांमधून), ८३ एम.आर्क. (७२ + ११ स्वायत्त महाविद्यालयांमधून), २३ एम.प्लॅन. यांचा समावेश आहे. यामध्ये मुलींमध्ये ९४.४४ टक्के आणि मुलांमध्ये ९२.४४ टक्के गुणवत्तेचा समावेश आहे. संशोधन पदव्यांच्या बाबतीत, या समारंभात ४२५ पीएचडी, ३ एम.एससी. (इंजिनिअरिंग) रिसर्च, आणि ५ इंटीग्रेटेड ड्युअल अभ्यासक्रमासाठी एकूण ४३३ संशोधन पदवी प्रदान केल्या जातील.
समारंभाचे अध्यक्षस्थान कर्नाटकमधील राज्यपाल आणि व्हीटीयूचे कुलपती थावरचंद गहलोत हे भूषविणार असून उच्च शिक्षण मंत्री आणि व्हीटीयूचे उपकुलपती डॉ. एम.सी. सुधाकर यांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ साजरा होईल.
तर प्रमुख पाहुणे म्हणून कन्याकुमारी एनआयसीएचइ चे कुलगुरू आणि प्रतिष्ठित शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस हे लाभणार आहेत.