बेळगाव लाईव्ह :बस कंडक्टरला मारहाण प्रकरणांमध्ये मारीहाळ पोलिसांकडून आणखी एकास अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सध्या चौघे जण पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यापैकी एक अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.आता आणखी एका आरोपी, मोहन हांचीनमनी वय (25) यास अटक करण्यात आली आहे.
कंडक्टर महादेवप्पाने दोन दिवसांपूर्वी तक्रार केल्यानंतर प्रकरणातील पहिल्या अटका झाल्या होत्या. हांचीनमणीच्या अटकेसह, या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तींची संख्या पाच झाली आहे. परंतु, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या उद्या सोमवारी बेळगाव येण्याआधी पोलिसांनी संशयितांना शोधण्यासाठी तपासणी सुरू केली आहे.
दरम्यान, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवासी मुक्कामावर अडकले आहेत. खासदार गोविंद कारजोळ यांनी सरकारकडे लवकरात लवकर सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी उद्या (सोमवारी) बेळगावला येणार आहेत, जिथे ते परिवहन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचे मूल्यांकन करतील आणि बस सेवा पुन्हा सुरू करण्याविषयी चर्चा करतील.
सीमेवर तणाव वाढल्यामुळे महाराष्ट्रातील बस सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे बेळगाव, कोल्हापूर आणि पुणे येथे प्रवासी अडकले आहेत.
साधारणपणे बेळगावतून शंभराहून अधिक बस सेवा उपलब्ध असतात, परंतु बहुतेक बस सध्या कर्नाटक सीमेपर्यंतच धावत आहेत. परिवहन विभागाने सूचना दिली आहे की परिस्थिती तणावग्रस्त राहिल्यास बस महाराष्ट्रात प्रवेश करू नयेत, ज्यामुळे प्रवासींच्या प्रवासाची समस्या आणखी बिकट झाली आहे.
चित्रदुर्गा येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाच बसला चालकाला काळे फासल्यानंतर महाराष्ट्रात कर्नाटक परिवार मंडळाच्या अनेक बसना काळे फासण्यात आले आहे. उद्या कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा बंद आहे त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे तर उद्या सोमवारी कर्नाटकचे परिवहन मंत्री बेळगाव दौऱ्यावर येणार असून परिवार मंडळाचे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.