बेळगाव लाईव्ह :लग्न लवकर जुळत नाही, ठरलेले स्थळ शेवटच्या क्षणी रद्द होते, या मनस्तापातून एका तरुणाने शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील के. के. कोप्प येथे काल रविवारी सकाळी उघडकीस आली.
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नांव बसवराज सोमाप्पा डोंगरगावी (वय 28, रा. के. के. कोप्प) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसवराज यांच्या लग्नासाठी मुली बघण्याचा कार्यक्रम सुरू होता.
अनेक वेळा स्थळ निश्चित होऊनही अखेरच्या क्षणी मोडता घातला जात होता. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे मनस्ताप वाढवून बसवराज याने नैराशीच्या भरात शेतातील कडुलिंबाच्या झाडाला प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गेल्या शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 ते रविवारी सकाळी 11 या वेळेत ही घटना घडली. गावकऱ्यांकडून याबाबतची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
तसेच बसवराज डोंगरगावी याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडला. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.