Wednesday, February 12, 2025

/

एफएफसीवर नंदगड महालक्ष्मी यात्रा निरीक्षणाची जबाबदारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलवर (एफएफसी) नंदगड येथील महालक्ष्मी यात्रा निरीक्षणाखाली ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याकरिता एफएफसीचे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आणि पद्मप्रसाद हुली यांच्या नेतृत्वाखाली फेसबुक फ्रेंड्स सर्कल पथक उद्या 12 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेवर आज रात्रीपासूनच लक्ष ठेवण्यासाठी नंदगडला रवाना झाले आहे.

फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे पथक नंदगड पोलिस पथकासमवेत समन्वयाने काम करून यात्रा सुरक्षित व सुरळीत पार पडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यात्रा निरीक्षणाची जबाबदारी सोपवल्याबद्दल अतिरिक्त एसपी आर.बी. बसर्गी, डीवायएसपी रवी डी. नाईक आणि पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांचे संतोष दरेकर यांनी विशेष आभार मानले आहेत.

एफएफसीचे बचाव कार्य पथक चार अग्निशामक यंत्रे, पाण्यापासून बचावासाठी लाइफ बुओस तसेच मोकळ्या विहिरी आणि तलावांजवळील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त साधनांनी सज्ज असणार आहे. हे एफएफसी पथक आज मध्यरात्री 12 वा. पासून उद्या 12 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:00 वाजेपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षितता आणि द्रुत प्रतिसादाची खात्री करून 130 स्वयंसेवकांच्या समर्पित गटाचे निरीक्षण करेल.

25 वर्षांनंतर होत असलेली यंदाची श्री महालक्ष्मी जत्रा आमच्यासाठी खास आहे. माझा विश्वास आहे की देवीने आम्हाला तिची आणि समाजाची सेवा करण्यासाठी निवडले आहे आणि योगदान देण्याच्या या संधीबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. पूर, कोविड-19 महामारी, आगीच्या घटना, पाणवठ्यांमधील बचाव कार्य, अपघातातील प्रतिसाद, राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत अन्न आणि औषधांचे वाटप, वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबिरे, रस्ता सुरक्षा प्रकल्प, आणि बेघरांना मदत करणे यासारखी आपत्ती व्यवस्थापन कार्ये हाताळण्याचा माझा पूर्वीचा अनुभव असल्यामुळे मला आमच्या बदकाच्या तयारीबद्दल पूर्ण विश्वास आहे, असे एफएफसी प्रमुख संतोष दरेकर यांनी सांगितले.Police

दरम्यान, नंदगड येथे तीन मुख्य तलाव आणि शेतात मोकळ्या विहिरी आहेत. शेतात जनावरांचा चारा साठवण्यासाठी कोरड्या गवताचे ढीग साठवले जातात. तेंव्हा यात्रेसाठी येणाऱ्या लोकांनी कोणतीही दुर्घटना किंवा घटना टाळण्यासाठी शेतात किंवा जंगल परिसर अथवा वाहन पार्किंग क्षेत्राजवळ आगी पेटवू नयेत. गावात बहुतेक रस्त्यांचा आकार लहान आहे आणि कांही ठिकाणी गटारींवर झाकणे नाहीत.

त्यामुळे त्यामुळे भाविकांनी, सार्वजनिकांनी एकाच ठिकाणी गर्दी करणे टाळावे. यामुळे कोणतीही अनुचित प्रकार अथवा घटना टाळण्यास मदत होईल. आपल्या बांधवांची सुरक्षा ही सर्वांची पहिली प्राथमिकता असली पाहिजे. एखादी व्यक्ती हरवलेली आढळल्यास तिला पुन्हा कुटुंबातील सदस्याला भेटवण्यासाठी यात्रेच्या ठिकाणी मदत कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही आणि प्रोजेक्टर स्क्रीनही मदतीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.