बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री येथे बस कंडक्टरच्या बाबतीतील हल्ल्याप्रकरण गांभीर्याने न घेता वाहकावर ‘पोक्सो’ गुन्हा दाखल करणारे मारीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. आय. कल्याणशेट्टी यांची शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक कल्याण शेट्टी यांच्या जागी सीसीआरबी शाखेचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांची मारीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक जी. आय. कल्याणशेट्टी यांची सीसीआरबी शाखेत बदली करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी स्पष्ट केले आहे.