बेळगाव लाईव्ह :भव्य अशा शिवकालीन शस्त्रप्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनानिमित्त आयोजक रोटरी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव साउथ यांच्यातर्फे आयोजित विविध स्पर्धांप्रसंगी निमंत्रणावरून खादरवाडी येथील मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मर्दानी मल्लखांब खेळाची श्वास रोखणारी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
रोटरी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव साउथ यांच्यातर्फे आयोजित शिवकालीन शस्त्रप्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनाचे औचित्य साधून शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. यावेळी आयोजकांच्या निमंत्रणावरून मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळा खादरवाडी,
बेळगावच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब या मर्दानी खेळाची श्वास रोखणारी प्रात्यक्षिके सादर करून सर्वांची वाहव्वा मिळविली. मल्लखांब सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अराव डोळेकर, वृषभ पाटील, अभिषेक हल्लुर,विराज पाटील, मंथन पाटील, भार्गव जगमानी,
चिराग पाटील, जाहिद सय्यद, संकल्प मोहिते, मयुरेश पाटील, दर्शन साळुंखे, स्वराज पाटील, ऋषिकेश डोळेकर, प्रणव सातेरी, श्रवण पाटील इ. मल्लखांबपटुंचा सहभाग होता.
उपरोक्त सर्व विद्यार्थ्यांना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ.राजश्री नागराजू (हलगेकर) व सर्व संचालक मंडळाचे प्रोत्साहन, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वनश्री नायर, एफसीएफ कमांडो -क्रीडाशिक्षक पै. अतुल शिरोले आणि मनोज बिर्जे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.