Friday, February 7, 2025

/

कुंभमेळ्याला गेलेल्या बेळगावच्या भाविकांवर पुन्हा काळाचा घाला

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाकुंभ मेळ्यात सहभागी होऊन प्रयागराज येथून भाविकांना बेळगावकडे परत घेऊन येणाऱ्या ट्रॅव्हलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅव्हलरने प्रथम एका दुचाकीला आणि त्यानंतर रस्त्याकडेला थांबलेल्या टँकरला धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात 6 जण ठार आणि 15 जण जखमी झाल्याची घटना इंदोर मध्यप्रदेश जिल्ह्यातील मानपुर येथील भेरू घाटामध्ये आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमधील 4 भाविक बेळगावचे असल्याचे समजते.

मध्यप्रदेश येथील इंदोर जिल्ह्यातील मान पोलिसांच्या कार्यक्षेत्रात ट्रॅव्हलर आणि टँकर यांच्यात झालेल्या या भीषण अपघातात 4 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेळगावच्या दुर्दैवी 4 जणांची नावे तात्काळ समजू शकली नाहीत.

सागर आणि नीतू नावाच्या बेळगावच्या दोघांनी उपचारादरम्यान जीव सोडला होता  बेळगावच्या मयतात 3 महिला एक पुरुष असल्याची माहिती उपलब्ध झाली  आहे बेळगावचे चारी मयत गणेशपुर ,शिवाजी नगर आणि होसुर  वडगाव भागातील आहेत असेही समजते.Indore

अपघातातील जखमींची नांवे देखील स्पष्ट समजू शकली नसली तरी जखमींमध्ये तुकाराम (वय 40), त्यांची पत्नी सविता (वय 35), शीतल (वय 27) श्रुती (वय 32), शिवसिंग (वय 31), बबीता (वय 56), राजू (वय 63), सुनिता (वय 50), प्रशांत (वय 52), शंकर (वय 60), लता (वय 62) आदींचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव येथील काही भाविक प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सहभागी होऊन काल गुरुवारी आपल्या ट्रॅव्हलर वाहनाने बेळगावला परत येण्यासाठी निघाले होते.

त्यावेळी मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील मानपुर येथील भेरू घाट येथे उतारावर एका दुचाकीला ठोकरल्यानंतर नियंत्रण सुटलेल्या ट्रॅव्हलरने (क्र. डीडी 01 एक्स 9889) पुढे रस्त्या कडेला थांबलेल्या टँकरला (एमपी 08 एचजी 8024) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ट्रॅव्हलर मध्ये चौघेजण जागीच गतप्राण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच मानपुर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन प्रथम मदत कार्य हाती घेतले त्यानंतर अपघाताचा पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे.

https://x.com/ians_india/status/1887764757639237748

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.