बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्याने काल बुधवारी बेंगलोर येथे झालेल्या नरेगा हब्बा-2025 समारंभात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2023 -24 सालासाठीचे 5 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावून कर्नाटकातील अव्वल कामगिरी करणारा जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. मनरेगा अंतर्गत विविध योजनांच्या अपवादात्मक अंमलबजावणीसाठी बेळगाव जिल्ह्याला हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सर्वोत्कृष्ट कायक बंधू पुरस्कार : सदर पुरस्कार कायक बंधू योजनेच्या अंमलबजावणीतील उत्कृष्ट प्रयत्नांची दखल घेत अनिता तुकाराम बेळगांवकर, टीएपी इओ रमेश हेडगे आणि तालुका आयईसी समन्वयक रमेश मादार यांना प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार : हा पुरस्कार हुक्केरी तालुक्यातील कोतबागी ग्रामपंचायतीने पटकावला आहे. हुक्केरी तालुका पंचायतचे ईओ टी.आर. मलनाडा, सहायक संचालक लक्ष्मीनारायण, ग्रामपंचायत अध्यक्ष बसवराज गोसुरी, आणि पीडीओ निरंजन कुरबेट्टा यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.
अमृत सरोवर जिल्हा पुरस्कार : अमृत सरोवर योजनेच्या अंमलबजावणीतील उत्कृष्टतेची कबुली देणारा हा पुरस्कार बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे, नियोजन संचालक रवी बांगरेप्पा, एडीपीसी बसवराजू आणि जिल्हा आयईसी समन्वयक प्रमोद गोडेकर यांनी स्वीकारला. सर्वोत्कृष्ट
जिल्हा एकात्मता पुरस्कार : सुधारित निकालांसाठी विविध विभागांचे एकत्रिकरण करण्यातील जिल्ह्याच्या यशाच्या गौरवार्थ दिला जाणारा हा पुरस्कार बेळगाव जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनागौडा पाटील आणि सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक के.एस. गोरावरा यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक व परिमंडळ वनाधिकाऱ्यांनी स्वीकारला.