बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करावा त्या मागणीसाठी मच्छे भागातील शेतकऱ्यांचे हेसकॉम करायला समोर आंदोलना होणार आहे त्या आंदोलनास तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठिंबा दिला आहे. तालुका महाराष्ट्र समितीची नुकतीच बैठक झाली त्या बैठकीत शेतकऱ्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मच्छे हेस्काँम कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मच्छे वाघवडे ,संतीबस्तवाड , कर्ले, किणये , बाळगमट्टी आदी भागामधील शेतकऱ्यांवर सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबत अन्याय केला जात आहे. शेतकऱ्यांना दिवस सात तास थ्री फेज वीजपुरवठा करणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना दिवसा पाच तास आणि रात्रीच्या वेळी 10 ते 12 च्या दरम्यान पुन्हा दोन तास थ्री फेज वीजपुरवठा केला जातो मात्र रात्रीच्या वेळी केला जाणारा वीजपुरवठा हा शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतं नसल्याने दिवसा सलग सात तास थ्री फेज वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
रात्रीच्या वेळी या भागात वीजपुरवठा नसल्याने शेतकऱ्यांसह शाळकरी मुले, जनावरे या सोबत पोल्ट्री व्यवसाय आदी गोष्टींवर परिणाम होत आहे आणि मोठे नुकसान होत आहे त्यामुळे किमान रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा केला जावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
वरील मागण्यांच्या पूर्ततेसाठी 4 फेब्रुवारी रोजी मच्छे हेस्काँम कार्यालयासमोर सकाळी 11.00 वाजल्यापासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे तरी या या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सभाही होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाठिंबा दिला आहे. तरी तालुका समितीच्या माध्यमातून बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.