बेळगाव लाईव्ह :यंदाच्या पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेला येत्या शनिवार दि. 1 मार्च 2025 पासून प्रारंभ होणार असल्यामुळे शिक्षण खात्याच्या तयारीला वेग आला आहे.
यावेळी कॉपीला आळा घालण्यासाठी बारावी परीक्षेचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून त्यासाठी बेळगाव व चिकोडी जिल्हा पदवी पूर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
यंदा बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील एकूण 96 परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा होणार आहे. यापैकी बेळगाव शहरात वीस तर बेळगाव शैक्षणिक
जिल्ह्यात 21 परीक्षा केंद्र असून चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 55 परीक्षा केंद्रीय आहेत सदर सर्व केंद्रांवर जिल्हा पदवी पूर्व शिक्षणाधिकारी कार्यालयातून थेट प्रक्षेपणाद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे .
परीक्षा सुरळीत व्हावी यासाठी कर्नाटक सेक्युलर एक्झामिनेशन सिस्टीमचा वापर केला जाणार आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असल्याने त्या केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज थेट प्रक्षेपणाद्वारे तपासले जाणार आहे एखाद्या केंद्रावर कॉपी किंवा इतर गैर हालचाल होत असल्यास तातडीने आवश्यक सूचना करून त्याला आळा घातला जाणार आहे.