बेळगाव लाईव्ह : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल १०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्त्यांच्या डांबरीकरण तसेच मजबुतीकरणासाठी १८ विविध प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
या मंजूर प्रकल्पांमध्ये बेळगाव, गोकाक, रामदुर्ग, बैलहोंगल आणि सौंदत्ती तालुक्यांतील अनेक रस्त्यांचा समावेश आहे. यामध्ये गोकाक तालुक्यातील जांबोटी-रबकवी राज्य महामार्ग (राज्य महामार्ग -54): अक्कातंगरहळ क्रॉस ते मदवाळा (कृतानाल रोड) आणि कोलवी फॅक्टरी क्रॉस ते ममदापूर क्रॉस रस्त्याच्या सुधारणेसाठी – ४ कोटी रुपये,
गोकाक आरटीओ कार्यालय ते मलविन्णी क्रॉस (राज्य महामार्ग -31) रस्ता सुधारणा – २ कोटी रुपये, लोळसूर – घटप्रभा नदीवरील पुलासाठी – ४० कोटी रुपये, बेळगाव शहर व परिसरातील जांबोटी-रबकवी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग -4 क्रॉसपर्यंत) डांबरीकरण – १ कोटी रुपये, महाराष्ट्र सीमा ते राकसकोप-सुतगट्टी SH-141: १९.५० किमी ते २३.४९ किमी रस्ता मजबुतीकरण – ४ कोटी रुपये, रायचूर-बाची मार्ग (३४४.२० किमी ते ३४५.०० किमी) डांबरीकरण – १ कोटी रुपये,
वडगाव-धामणे-अवचारट्टी रस्ता (०.०० किमी ते ८.२० किमी) – ४ कोटी रुपये, येळ्ळूर-अवचारहट्टी-यरमाळ मार्ग (१.४० किमी ते २.२० किमी) – १ कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्ग -4 ते देसूर रेल्वे स्थानक (वाघवडे, लक्ष्मीनगरमार्गे) – १ कोटी रुपये, जांबोटी-रबकवी रस्ता (रंकुंदे क्रॉस ते व्हीटीयू) – २ कोटी रुपये,
बैलहोंगल तालुक्यातील असुंडी-हिट्टंगी-सुतगट्टी रस्ता डांबरीकरण – ६ कोटी रुपये, सौंदत्ती तालुक्यातील अवराड-सदाशिवगड रस्त्याचे मजबुतीकरण – ६ कोटी रुपये, अरबावी-चलकेरी मार्गावरील मलप्रभा बॅकवॉटरजवळ पूल बांधकाम – ६ कोटी रुपये,
गोकाक-सौंदत्ती राज्य महामार्ग -103 मार्गावरील मलप्रभा बॅकवॉटरजवळ पूल बांधकाम – १२ कोटी रुपये, रामदुर्ग तालुक्यातील मुनवळ्ळी कोट्टमचगी रस्त्याचे मजबुतीकरण – ६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांमुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महामार्ग आणि जिल्हा मुख्य रस्त्यांची सुधारणा होणार असून, वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे.