Sunday, February 23, 2025

/

भुईकोट किल्ल्यावर ऐतिहासिक दुर्ग पूजा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :दुर्गसंवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था आणि किल्ले संवर्धन समिती यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ऐतिहासिक दुर्ग पूजा सोहळा बेळगाव येथील भुईकोट किल्ल्यावर रविवारी उत्साहात पार पडला या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतीतील इतर नऊ राज्यातील १३१ हून अधिक गड-किल्ल्यांवर तसेच परदेशातील ६ किल्ल्यांवर एकाच वेळी विविध सरदार, संस्थानिक आणि राज घराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ऐतिहासिक दुर्ग पूजा करण्यात आली.

बेळगावात निपाणी येथील ऐतिहासिक निंबाळकर सरदार घराण्याचे वंशज दादासाहेब निंबाळकर आणि शिवाजी ट्रेलचे संयोजक रमेश रायजादे सुनील जाधव, गुणवंत पाटील,शंकर बाबली यांच्या हस्ते किल्ल्यावरील लेण्यांमध्ये असणाऱ्या ध्वज व दुर्ग पूजा संपन्न झाली. यांसह शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी उपस्थित होते.

दुर्ग संवर्धन कार्याला बळकटी मिळावी, सर्वसामान्य नागरिक आणि शिवभक्त गड-किल्ल्यांकडे आकर्षित व्हावेत, प्रत्येक्ष गड-किल्ल्यांवर उपस्थित राहावेत, त्यांना गड-किल्ले पाहण्याची आणि त्यातून नंतर त्यांच्यात दुर्गसंवर्धनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने शिवाजी ट्रेल या संस्थेच्यावतीने सुमारे 24 वर्षांपूर्वी प्रत्यक्ष गड-किल्ल्यांवर जाऊन दुर्गपूजेचा उपक्रम सुरु करण्यात अला, अशी माहिती शिवाजी ट्रेलचे रमेश रायजादे यांनी दिली.

चोवीस वर्षांपुर्वी सुरू करण्यात आलेली दुर्ग पूजा ही 2013 पर्यंत एकाच गडावर ठरलेल्या वेळी संस्थेचे सर्व सभासद एकत्र जमत असत व दुर्गपूजा करत असत. मात्र संस्थेच्या सभासदांची वाढती संख्या लक्षात घेता 2013 नंतर एकाच वेळी विविध गड-किल्ल्यांवर दुर्गपूजा करण्याचे नियोजन संस्थेच्यावतीने करण्यात आले.Fort pooja

त्यानुसार 2014 पासून संस्थेच्यावतीने एकाच वेळी विविध गड-किल्ल्यांवर दुर्गपूजेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये 14 गड-किल्ल्यांवर तर 2015 मध्ये 81 गड-किल्ल्यांवर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुर्गपूजा संपन्न झाली. फक्त महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर होणारी शिवाजी ट्रेलची ही दुर्गपुजा 2016 मध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, पंजाब, केरळ आणि तामिळनाडू मधील 121 गड-किल्ल्यांवर संपन्न झाली, त्यात विविध सरदार आणि संस्थानिक घराण्यातील वंशज सहभागी झाले होते.

2016 च्या दुर्गपुजेची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेत विक्रमाची नोंद केली होती. 2017 मध्येही देशभरातील 123 किल्ल्यांवर एकाच वेळी दुर्ग पूजा करण्यात आली होती. 2018 मध्ये देशभरातील 125 किल्ल्यांसह प्रथमच विदेशातील सिंगापूर येथील दोन किल्ल्यावर दुर्गपुजा करण्यात आली होती, अशी माहिती निपाणीचे दादासाहेब निंबाळकर यांनी दिली.

*शिवाजी ट्रेल तर्फे राजहंस गड, येळ्ळूर येथे पूजा.*

सालाबादप्रमाणे पुणे स्थित शिवाजी ट्रेल ह्या संघटने मार्फत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा सैन्याच्या भारत भर पाऊल खुणा असलेल्या गडांवर, स्वराज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते, एकाच दिवशी, जास्ती जास्त गडांवर पुजा केली जाते. त्याचाचं भाग म्हणून बेळगाव येळ्ळूर जवळील किल्ला, राजहंस गडाची सपत्नीक पूजा शिवाजी ट्रेलचे संयोजक आणि सद्भावना दूत श्रीमंत रमेशराव केशवराव रायजादे, हारोलीकर सरकार आणि दिलीपराव केशवराव रायजादे हारोलीकर सरकार, यांच्या हस्ते दि. २३/०२/२०२५ रोजी पार पडली. या कार्यक्रमाच्या मार्फत भावी पिढीला ह्या गड किल्ल्यांचे महत्व पटवून देणे आणि किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन व्हावे या उद्देशाने किल्ल्यांचे पूजन केले जाते.कर्नाटक सरकार व केंद्र सरकारने या किल्ल्यांचे संवर्धन करावे जेणे करून हे किल्ले भावी पिढीला पहायला मिळतील. हे किल्ले म्हणजे जुन्या काळातील शुरवीरांनी आपलं रक्त सांडून केलेल्या पराक्रमाचे हे किर्तीस्तंभ आहेत. त्याचे जतन होने ही काळाची गरज आहे.
पुजेचे पौरोहित्य श्री. बसवराज मठपती ह्यांनी केले. ह्या कार्यक्रमाला श्रीमंत सौ. सुचिता रमेशराव रायजादे हारोलीकर सरकार, श्रीमंत दिलीपराव केशवराव रायजादे हारोलीकर सरकार, श्रीमान सतीशराव कृ. चीरमोरे, किल्लेदार गडकरी, पारगड, सौ. स्मिता सतीशराव चीरमोरे, किल्लेदार गडकरी, पारगड, सर्व कु. चि. कुलदीपराव रायजादे, चि. शिवराज चीरमोरे, तसेच कार्यक्रमाला धारवाड चे सर्व श्री किरण जाधव केतन हजेरी, भिम जे.के., सागर दोडवाड, आखिल पवार, शशिकुमार दोडवर आदी शिवप्रेमी वउपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.