बेळगाव लाईव्ह :घरासमोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाची बॅटरी चोरून पोबारा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाला स्थानिकांनी रंगेहात पकडून चांगला चोप पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना काल रामतीर्थनगर येथे घडली.
पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव सागर सिंग असे आहे. रामतीर्थनगर येथील चन्नबसवेश्वर लेआउट येथे दोघे चोरटे एका घरासमोर पार्क केलेल्या मालवाहू वाहनाची बॅटरी चोरून पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. सदर बाब स्थानिकांच्या निदर्शनास येतात त्यांनी एकाला शिताफिने पकडले.
दुसरा चोरटा मात्र त्यांच्या हातातून निसटण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या चोरट्याला चांगला चोप देऊन चौकशी केली असता त्याने स्वतःचे नांव सागर सिंग असे सांगितले.
दरम्यान सदर घटनेची माहिती माळमारुती पोलिसांना देऊन स्थानिकांनी चोरट्याला त्यांच्या ताब्यात दिले. कालच महांतेशनगरमध्ये एका महिलेची साखळी लुटण्यात आल्याची घटना घडली होती.
सदर चोरीचा उलगडण्यापूर्वीच आणखी एक चोरीचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडे दिवसाढवळ्या चोरीच्या घटना वाढत असल्यामुळेजनतेने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.