Saturday, January 4, 2025

/

तरुणाचा प्रामाणिकपणा : किंमती मोबाईल केला परत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :एकीकडे काल मध्यरात्री नववर्ष स्वागताचा जल्लोष सुरू असताना त्याचवेळी दुसरीकडे रस्त्यावर सापडलेला किमती मोबाईल फोन रोहन लंगरकांडे या युवकाने आज मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.

याबाबतची माहिती अशी की, माळी गल्ली येथील रोहन शंकर लंगरकांडे हा युवक काल 31 डिसेंबरच्या मध्यरात्री कामावरून घरी जात असताना त्याला रेल्वे पोलीस स्थानकासमोरील स्टेशन रोड या रस्त्यावर एक किमती मोबाईल फोन पडलेला आढळून आला.

अनावधानाने एखाद्याच्या खिशातून हा फोन पडला असावा आणि ज्याचा फोन आहे तो आपला फोन शोधण्यासाठी त्यावर कॉल करेल असा अंदाज बांधून रोहन याने तो फोन स्वतःसोबत घरी नेला. त्यानंतर रोहनचा अंदाज खरा ठरला आणि आज बुधवारी सकाळी कणबर्गी येथील किरण बिरादार या युवकाचा त्या फोनवर कॉल आला.

Rohan l

Rohan 

तेंव्हा संपूर्ण शहानिशा केल्यानंतर रोहन लंगरकांडे यांने बिरादार याला सकाळी माळी गल्ली येथे बोलावून घेऊन त्याच्याकडे त्याचा सुमारे 60 हजार रुपये किमतीचा मोबाईल सुखरूप सुपूर्द केला. नववर्षाच्या स्वागतासाठी सांगाव येथे आयोजित पार्टी उरकून घरी परतत असताना अनावधानाने आपल्या खिशातील मोबाईल स्टेशन रोडवर पडला असावा असे यावेळी किरण बिरादार यांनी सांगितले.

बिरादार याच्याकडे मोबाईल सुपूर्द करतेवेळी रोहन समवेत शिवाजी मेणसे, कल्लाप्पा कसलकर व महेश धामणकर उपस्थित होते. या पद्धतीने हरवलेला महागडा मोबाईल फोन त्याच्या मूळ मालकाला प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल रोहन लंगरकांडे याची मित्रपरिवारासह परिसरात प्रशंसा होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.