बेळगाव लाईव्ह : ऑलम्पिकमध्ये हॉकीत प्रतिनिधित्व केलेले बेळगावचे सुपुत्र कै. बंडू पाटील यांच्यानंतर बेळगाव परिसरात म्हणावा तेवढा मोठा हॉकी खेळाडू बनला नाही हे खरे असले तरी अनेक लहान मोठे हॉकी खेळाडू बेळगाव मधून तयार झालेले आहेत. अजूनही राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
बेळगावच्या मुलीची नॅशनल हॉकी स्पर्धेसाठी 19 वर्षाखालील कर्नाटक संघात निवड झाली आहे.
बेळगाव तालुक्यातील येळळूर गावची कन्या भूमी वसंत कुगजी हिची 19 वर्षाखालील हॉकी कर्नाटक संघात निवड झाली आहे. आगामी 26 जानेवारी पासून झारखंड येथील रांची ते होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी होणार आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेली भूमी सध्या जीएसएस कॉलेजमध्ये सायन्स विभागात द्वितीय वर्षात शिकत आहे.
1 जानेवारी रोजी कोडगु येथे झालेल्या निवड चाचणीत भूमी हिची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. भूमी ही संघात फॉरवर्ड स्थानावर खेळत असते.
बेळगाव सख्या शहरात अद्याप एस्ट्रो टर्फची सुविधा नाही केवळ मातीच्या मैदानावर सराव करत भूमी हिने राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यात मजल मारली आहे. हॉकी बेळगावचे सचिव हॉकी कोच सुधाकर चाळके ,ओनररी कॅप्टन उत्तम शिंदे यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.