बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील मारिहाळ येथील पतीच्या मित्रासोबत पळालेल्या पत्नीचा आज शोध लागला असून पतीच्या अनैतिक संबंधांमुळे नाराज झाल्याने आपण हे पाऊल उचलल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे…
बेळगाव जिल्ह्यातील मारिहाळ गावात एका युवकाने त्याच्या पत्नी आणि मुलांना त्याच्या मित्राने अपहरण केले असल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार, त्या मित्राच्या पत्नीनेही पतीला शोधून देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, पतीने केलेल्या तक्रारीनंतर मुले, दागिने आणि कार घेऊन पळून गेल्याचा आरोप असलेली मसाबी आज न्यायालयात हजर झाली आणि म्हणाली, मी गेल्या ९ वर्षांपासून बसवराज सीतीमणीवर प्रेम करत होते. माझ्या कुटुंबाच्या आग्रहास्तव मी लग्न केले. पण मी माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या महिलेच्या सहवासाला कंटाळले आहे. मी ते अनेक वेळा सांगितले आहे.
मात्र माझ्या पतीने माझे ऐकले नाही. शिवाय परस्त्रीसोबत अनैतिक संबंधही ठेवले. यामुळे मी माझ्या प्रियकराशी संपर्क साधून त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
मला आता दोन मुली आहेत. मी त्यांच्यासाठी खूप संपत्ती कमावली आहे. माझ्यावर माझ्या पतीने निराधार आरोप केल्याचेही सदर महिलेने सांगितले.