बेळगाव लाईव्ह : टिप्पर दुचाकीत झालेल्या अपघातात आंबेवाडी गावचे दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. अलतगा खडी मशीन जवळ हा अपघात झाला होता.
योगेश न्हावी वय 24 आणि नितेश तरळे वय 27 अशी अपघातात मयत युवकांची नावे असून बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार वैजू आणि योगेश हे दोघेही मौनी अमावस्या निमित्त काम सुट्टी असल्याने दुचाकीवरून फिरायला गेले होते.
वैजु तरळे हा बेळगाव शहरात कार मेकॅनिक काम करत होता तर योगेश न्हावी याचे हिंडलगा येथे सलूनचे दुकान होते.या घटने नंतर आंबेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
कडोली अलतगा जवळ दुचाकी वरून उतरती असताना टिप्परच्या धडकेत दोन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. काकती पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.गुरुवारी सकाळी 11 वाजता दोन्ही युवकांवर आंबेवाडी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत