काँग्रेस मेळाव्यासाठी 21 जाने.ला वाहतूक मार्गात बदल

0
2
Traffic diversion
 belgaum

बेळगाव लाईव्ह :क्लब रोड, बेळगाव येथील सीपीएड मैदानावर काँग्रेस पक्षातर्फे येत्या मंगळवार दि. 21 जानेवारी 2025 रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या जय बापू, जय भीम, जय संविधान अधिवेशनादरम्यान सुरळीत रहदारीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून नागरिकांना विनंती आहे की त्यांनी नमूद केल्यानुसार पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी केले आहे.

काँग्रेस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुढील वाहतूक नियम लागू होतील. प्रतिबंधित प्रवेश : दि. 21 जानेवारी 2025 रोजी पुढील मार्गांवर फक्त अधिवेशनाला येणाऱ्या वाहनांनाच परवानगी असेल

: चन्नम्मा सर्कल, क्लब रोड, गांधी सर्कल, शौर्य सर्कल, शरकत पार्क आणि ग्लोब थिएटर रोड. इतर वाहनांना श्री शनि मंदिर किंवा भातकांडे शाळेचा मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 belgaum

अवजड वाहनांवर बंदी :
दि. 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून ते अधिवेशन संपेपर्यंत कोणत्याही दिशेकडून शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.

नियुक्त ड्रॉप-ऑफ आणि पार्किंग : चन्नम्मा सर्कल येथून कॉलेजरोड मार्गे संमेलनात सहभागी होणाऱ्यांसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी प्रवाशांना अर्थात कार्यकर्त्यांना चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, यंदे खुट, देशपांडे खुट आणि म. गांधी सर्कल येथे सोडावे (ड्रॉप-ऑफ). या वाहनांसाठीचे पार्किंग शौर्य सर्कल मार्गे प्रवेश करण्यायोग्य बेवूर रोडवर उपलब्ध असेल,
असे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.