बेळगाव लाईव्ह : तहसीलदार कार्यालयातील एसडीए रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या तहसीलदार बसवराज नागराळ यांना राज्य सरकारने पुन्हा त्याच पदावर नियुक्त केल्याबद्दल जिल्हाधिकारी व सरकारकडे विचारणा करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
“एसडीए रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या तहसीलदार बसवराज नागराळ यांना पुन्हा नियुक्त करणे योग्य नाही,” असा आरोप खासदार जगदीश शेट्टर यांनी केला होता.
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री जारकीहोळी म्हणाले, “सरकारने तहसीलदार नागराळ यांची बदली केली नाही. ते रजेवर गेले होते आणि आता पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि सरकारच्या स्तरावर चर्चा केली जाईल.”
एसडीए आत्महत्येप्रकरणात तहसीलदारावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत आणि त्यांच्या नियुक्तीच्या निर्णयावर आता पुढील चर्चा व निर्णय होण्याची शक्यता आहे.