बेळगाव लाईव्ह : रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्यातर्फे येत्या प्रजासत्ताक दिनी येत्या रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता महावीर भवन, हिंदवाडी बेळगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्या इव्हेंट चेअरमन रो. अश्विनी पाटील यांनी दिली.
शहरात आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. या शिबिराला रोटरी परिवाराचा संपूर्ण पाठिंबा मिळाला आहे. शिबिरासाठी आम्हाला सेंट्रा केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्य लाभले असल्याचे सांगून रो. अश्विनी पाटील यांनी काँग्रेस रोड, टिळकवाडी स्थित सेंट्रा केअर हॉस्पिटलची माहिती दिली.
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष रो. विनय बाळेकाई यांनी यावेळी बोलताना आपच्या क्लबचा यंदा रौप्य महोत्सव साजरा होत असून त्याचाच भाग म्हणून येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी महावीर भवन येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे सांगितले.
या शिबिरासाठी आम्हाला रेड क्रॉस सोसायटी बेळगाव शाखेसह रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल, साउथ, नॉर्थ, मिडटाऊन, ई-क्लब, ईलाइट, इनरव्हील क्लब, बी. टी. पाटील अँड सन्स फाउंडेशन, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन बेळगाव, क्रेडाई, राजस्थानी युवक सेवा मंडळ, लिंगायत बिजनेस फोरम, बेळगाव कर्नाटक राज्य पोलीस, इंडियन चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन, जितो, हायटेक मोटर्स अँड ऑटोमोबाईल्स प्रा. लि. वगैरेंचे सहकार्य लाभत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही या रक्तदान शिबिराची पूर्वतयारी करत असून या काळात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्यामुळे शिबिराला जवळपास 1 हजार रक्तदाते प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने यंदा आम्ही एक नवा उपक्रम सुरू करत आहे.
या उपक्रमांतर्गत बेळगाव ब्लड बँक, केएलई ब्लड बँक, महावीर ब्लड बँक, सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक, महेश फाउंडेशन ब्लड बँक, रेड क्रॉस सोसायटी व रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्यावतीने शिबिरात सहभागी रक्तदात्यांना रक्तदाता पासपोर्ट मोफत दिला जाईल. सर्वसामान्यपणे सरकारकडून दिला जाणारा पासपोर्ट कसा असतो तसाच हा ‘रक्तदाता पासपोर्ट’ असणार आहे.
पासपोर्टचा हा उपक्रम विविध देशात राबविण्यात आला असून तो यशस्वीही झाला असल्याचे सांगून बाळेकाई यांनी रक्तदाता पासपोर्टच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. तसेच सध्या 800 रक्तदाता पासपोर्ट आम्ही तयार केले असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेस क्लबचे सेक्रेटरी लतेश पोरवाल, शिबिराचे संयोजक डी. बी. पाटील, केतन नंदेश्वर आदी उपस्थित होते