बेळगाव लाईव्ह : अन्नोत्सव 2025 मध्ये जल्लोषाचा उत्सव कायम आहे. खाद्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून, संगीत व खाद्यपदार्थांच्या संगमाचा आनंद घेत आहेत. 10 जानेवारी रोजी आयोजित बेळगाव सागर यांच्या सूफी नाईटने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांना एक जादुई अनुभव दिला.
.11 जानेवारीला अलाग रिदम बँडने बॉलिवूड हिट गाण्यांवर उपस्थितांना थिरकवले. कार्यक्रमात संगीत, नृत्य, आणि स्वादिष्ट पदार्थांचा परिपूर्ण संगम पाहायला मिळाला. विविध खाद्य स्टॉल्समधून संगीत आणि स्वादिष्ट अन्नाचा परिपूर्ण संयोजन अनुभवत पर्यटक त्यांच्या आवडत्या गाण्यांवर थिरकले.
शाकाहारींसाठी स्टॉल क्रमांक 68 वरील भैय्या समोसा हे ठिकाण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून येथे समोसा व छोले यांसारख्या अस्सल अवधी पदार्थांची चव घेता येते.
तर मांसाहारींसाठी स्टॉल क्रमांक 20 वरील मंटूस सावजी ठिकाण मटण चॉप्स, खिमा बॉल्स, आणि पाया सूप यांसारख्या सवाजी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रोटरी तडका (स्टॉल क्रमांक 37-38): 12 जानेवारीला केवळ एक दिवसासाठी सवाजी मेनू खास उपलब्ध आहे. येथे खिमा बॉल्स, चिकन रस्सा, आणि येडमी यांसारखे पदार्थ चाखण्याची संधी मिळणार आहे.
खवय्यांसह लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले मनोरंजन पार्कही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. 12 जानेवारीला विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून शानदार श्रिया यांचा संगीत कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक आणि राष्ट्रीय संघटन सचिव सुरेश जैन यांनी अन्नोत्सव 2025 ला भेट दिली. या वेळी पीपी आरटीएन जीवन खटाव, चेअरमन अक्षय कुलकर्णी, अध्यक्ष सुहास चिंडक, जिल्हा गव्हर्नर शरद पै, अविनाश पोतदार, सचिव डॉ. मनीषा हेरेकर आणि चेअरमन शैलेश मांगले यांची उपस्थिती होती.
अन्नोत्सव 2025 हा संगीत, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचा जल्लोषपूर्ण संगम ठरत असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद अन्नोत्सवाला मिळत आहे.